ठाणे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी ठाणे कोर्टामध्ये आज (मंगळवार) सुनावणी पार पडली.यावेळी कोर्टाने आव्हाड यांना मोठा दिलासा दिला आहे. विनयभंग प्रकरणी आव्हाड यांना अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. या प्रकरणी आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी आव्हाड यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.दरम्यान, सुनावणी सुरू होण्याआधी एसीपी सोनाली ढोले यांनी जोरदार दावा केला होता. या प्रकरणी मुंब्रा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे. आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे, त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल. त्यांना अटक पूर्व जामीन देवू नये. तसेच वर्तकनगर पोलिसांनी दिलेल्या जामिनात अट आहे. जामिनावर असताना कोणताही गुन्हा करु नये, अशी मागणी ढोले यांनी केली. तर आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात लॅपटॉप आणला होता. ज्यावर न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली.
'व्हिडीओ पाहिला तर कळेल जाणीपुर्वक ढकलले आहे. महिलेने तक्रार दिली की तिचा खांदा जोरात दाबला गेला. ओळखीची महिली होती तर मग तोंडाने सांगितले पाहिजे होते हाताने धरुन बाजूला करणे योग्य आहे का? यात अनेक साक्षीदार आहेत आणि पुढे तपास करायचा आहे.
