⭕ *"मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा" या अभियानामध्ये तालुका स्तरावर गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल ला मिळाला तृतीय क्रमांक...मा.मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा. अभियानातील उपक्रमात उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल निवड..!!⭕*



       

    ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:बळवंत मनवर )       

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]              

⭕  यवतमाळ / पुसद  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१० माचॅ रविवार :- यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूल पुसद या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये वर्ग सजावट,बाल संसद, वृक्ष रोपण,परसबाग,आरोग्य तपासणी शिबीर,बचत बँक,आर्थिक मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राजस्थान राज्याची माहिती,माजी विद्यार्थी मेळावा,व्यवसाय मार्गदर्शन,किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन,स्वच्छता मॉनिटर इत्यादी अनेक उपक्रम घेण्यात आले. सदर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानचा कालावधी 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी इतका होता.या कालावधी मध्ये शाळेत अभियानातील उपक्रम नियोजना नुसार घेण्यात आले.या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांना अधिक कृतिशील बनविणे हा होता.सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक मो.सादिक सरांनी शाळेतील शिक्षक सैय्यद सलमान सरांची अभियानचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती.त्यानुसार सलमान सरांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या मार्गर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या अभियानातील विविध उपक्रम नियोजनानुसर पार पाडले. या अभियानामध्ये पुसद तालुका पातळीवर अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.  त्यापैकी तालुका पातळीवर खाजगी गटात  गुलाम नबी आझाद उर्दु हायस्कूलला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. त्या बद्दल  मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.डॉ.वजाहत मिर्झा साहेब व सचिव मा.सज्जाद मिर्झा साहेब यांनी शाळेला मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments