⭕ *महात्मा फुले नगर बनले वरलीचे माहेरघर...नवीन ठाणेदारांसमोर जुने आव्हान...*⭕



( रिसोड तालुका प्रतिनिधी :- अमर रासकर )

      [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / रिसोड  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ फेबुवारी शुक्रवार:-वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात अवैध धंदे वाल्यांनी अक्षरशः थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिस विभागाची वदरहस्थ नसल्याचे दिसून येते.यामुळेच अवैध धंदे करणारे हे बिनधास्तपणे कोठे आपली दुकाने थाटून आपला खिसा गरम करत आहे. यामुळे आता नवीन ठाणेदारांसमोर जुने आव्हान असल्याचे दिसून येत आहे नवीन ठाणेदारांनी या परिसरात होत असलेली अवैध वरली मटका व अन्य अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अशी मागणी महात्मा फुले नगरवासी कडून केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वरली मटका खेळत असताना काही महिला सुद्धा आढळून आल्या आहेत यामुळे सदर वरली मटक्याने अनेकांची संसारे उध्वस्त्याची मार्गावर असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.एकीकडे  रोजगार नसलेल्या सामान्य नागरिकांना आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सतावत असून कसेबसे आपला उदरनिर्वाह चालवत आहे. मात्र वरली, मटका, एक्का बादशहा वाल्यांनी अक्षरशः  सामान्य गरिबांची लूट सुरू केली आहे. याकडे पोलीस प्रशासन जाणून-बुजून डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.  रिसोड येथील महात्मा फुले नगर परिसरात अवैध धंदेवाल्यांची अक्षरश थैमान घातल्यामुळे सामान्य नागरिकांची कुचंबना होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments