⭕ *लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीचे बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन...*⭕

 



   ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम  / मालेगाव  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२२ फेब्रुवारी गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील वाशिम : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ बांधकाम कामागारांना तातडीने मिळावा या मागणीसाठी आज दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये लागणारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामिण व शहरी भागामध्ये शासनाचा जि.आर असताना सुध्दा मुख्याधिकारी व ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यासाठी तयार नाही.  वाशिम जिल्हा कामगार कार्यालयातून काही राजकीय आर्थीक हितसंबंध जपून काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे बीवोसीडब्ल्यू मध्ये, आस्थापना नोंद करून प्रमाणपत्र विकण्याचा गोरख धंदा सुरू आहे. तसेच बांधकाम कामगारांना लाभ पोहोचवण्यासाठी सुध्दा प्रत्येक योजनेमध्ये अर्ध्यात आम्ही अर्ध्यात तुम्ही असा आर्थीक हितसंबंधीच्या जोर दलालशाहीच्या माध्यमातून जिल्हा कामगार कार्यालयाचा कारभार सूरू आहे. नोंदणी प्रमाणपत्राचा आस्थापना मालक वाशिम जिल्ह्यामध्ये सरळ सरळ व्यापार करतांना दिसत असल्याचा आरोपासह अन्य मागण्या निवेदनात करुन यावर त्वरीत रोख लावून कार्यवाही करावी व हा गोरख धंदा थांबवावा अन्यथा कामगार कार्यालयाला बेमुदत घेराव व आंदोलन करण्याचा इशारा लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख सईद शेख हमजा, उमेश ज्ञानेश्‍वर बनसोड, विकास विष्णू खिल्लारे, शेख यूसफ शेख अयुब, मोहम्मद अलीम मोहम्मद हादी, शेख अफरोज शेख सहमत, शेख वाजीद शेख कासम, नसीबा खा जलली खा, अब्दुल अकील अ. गफ्फार, शेख अली शे. लड्डू, शे. महेबुब शे. गांजी पाशा, महादेव दैनू राऊत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments