( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ फेब्रुवारी बुधवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल मंगरूळ शाळेत विज्ञान दिनाचे औचित्य साधून मारियन मेगा एक्स्पो हे प्रदर्शन भरविण्यात आले. या वर्षी शाळा रौप्यहोत्सव साजरा करत आहे. परीक्षक म्हणून श्री जगदीश पाटील, श्री उमेश काटे. डॉ भाग्यश्री वानखेडे यांनी काम पहिले . या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सि, शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते. सौ हेमांगी सोनावणे यांनी प्रास्तविक केले शाळेचा विद्यार्थी उज्वल पाटील याने तयार केलेली विज्ञान दिनाची थीम सादर करून प्रदर्शनाचे उद्घाटन अनोखे पद्धतीने करण्यात आली. चे आकर्षक वैद्यनिक रांगोळी, चंद्रयान माडेल, तसेच विविध वैज्ञानिक माडेल कार्यक्रमा प्रमुख आकर्षण ठरले. प्रदर्शानात मुलांनी विज्ञान तसच इतर विषयातील मॉडेल्स सादर केले.प्रदर्शन यशस्वी करण्या साठी विज्ञान शिक्षका सौ पूजा शहा, सौ श्वेता पवार, सिस्टर जॉमी,सोनाल कालरा इ शिक्षकांनी परिश्रम घेतले.


