⭕ *जल जीवन मिशन चे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार...कामाची तपासणी करण्याची मागणी...*⭕

 


      ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:- अजय गायकवाड )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि : २४ फेब्रुवारी शनिवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत विहिरीचे खोदकाम, नळ योजनेची पाइपलाइन,पाण्याची टाकी बांधकाम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार वरदरी खुर्द येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशीम यांना केली आहे. वरदरी खुर्द हे गाव वणविभागाला लागून असून ह्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविन्यासाठी जलजिवन मिशन योजने अंतर्गत विहिरीचे खोदकाम ,नळ योजनेची पाइप लाइन,पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.कामावर अंदाजपत्रकाचा फलक नसल्यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येत नाही.कामाचा ठेकेदार कोण ?कामाबाबत कोणाला बोलावे कळेनासे झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली . पाइप लाइन बऱ्याच ठिकाणी जमिनीत खोलवर नसल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. टाकीचे बांधकाम कॉलम वर नसून जमिनीवर असल्यामुळे पाणी जमिनीत झिरपून जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या कामाची तपासणी मार्केसाहेब यांना सोडून इतर अधिकाऱ्याच्या मार्फत पंचासमक्ष करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेले काम त्वरित थांबविण्यात यावे व सर्व चौकशी झाल्यानंतर अंदाज पत्रकानुसार काम करण्यात यावे. कामावर कामाची माहिती देणारा फलक लावण्यात यावा.तसेच अद्याप पर्यंत झालेल्या कामाचे देयक देण्यात येऊ नये,अशी तक्रार वरदरी येथील ग्रामस्थ जगदीश चाफे,उमेश आंधळे,जगदीश मुंढे,शिवाजी घुगे,मुकिंदा शिरसाठ आदी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments