⭕ *"रिसोड तालुक्यात घरकुलाच्या कामात, गोंधळात गोंधळ"...*⭕

 





     ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी )     दि :२७ फेब्रुवारी मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिसोड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रिठद गावातील ७० वर्षीय विधवा महिला नर्मदाबाई महादेव खंदारे या महिलेची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. घर सुद्धा मातीचे व टिन पत्राचे आहे मागच्या भिंतीला टिन पत्रे लावून आपला नातवासह घर संसार चालवते या महिलेचे घरकुलाची यादीत नाव आहे परंतु अद्याप पर्यंत या विधवा महिलेला कोणत्याही योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला नाही याबाबत विधवा महिलेला न्याय मिळायला हवा होता, परंतु आज दोन वर्षे झाली कागदपत्रे देऊन, परंतु याबाबतची दखल संबंध ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी,सरपंच यापैकी कुणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळेच घरकुलाचा लाभ मिळायला उशीर होत आहे या महिलेचे वय ७० वर्षे असून हि  महिला मृत्यू पावल्यावर लाभ मिळणार का? असा प्रश्न निर्माण या महिलेचे उपस्थित केला आहे. ग्राम विकास अधिकारी रिठद, गटविकास अधिकारी रिसोड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यापर्यंत आर्त हाक पोहोचविण्यासाठी या महिलेने आपल्याला  घरकुल मिळण्यासाठी मागणी केली आहे. तरी कोणत्याही योजनेअंतर्गत या मागासवर्गीय महिलेला न्याय घरकुलाचा मिळावा.ही रास्त मागणी घरकुलाच्या वंचित लाभार्थी नर्मदाबाई खंदारे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments