⭕ *सावंगा जहागीर ते तोरणाळा येथील डांबरीकरण रस्त्याचे मनमानी कारभार...*⭕

 



    ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड ) 

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / वाशिम ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ फेब्रुवारी गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील सावंगा जहागिरी ते तोरणाळा येथील डांबरीकरण रस्ता सात किलोमीटर अंतराचा असून या रस्त्याचे काम निस्कृत दर्जाचे दिसून आले आहे याबाबत सावंगा जहागिरी ते तोरणाळा हा रस्ता सात किलोमीटरचा असून सावंगा जहागीर येथील ग्रामपंचायत सरपंच सुभाष ढोके, ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य दिपक विश्राम आगलावे, यांनी या रस्त्याची पाहणी करून प्रत्यक्ष माहिती दिली या डांबरीकरण चे ठेकेदार बुंदे ठेकेदार असून, याकडे थोडं दुर्लक्ष दिसून येत आहे कुठलीही या रस्त्याची साफसफाई न करता या रस्त्यावर डांबरीकरणाला सुरुवात केली आहे वाशिम जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कामाकडे दुर्लक्ष ग्रामपंचायत सदस्य दीपक विश्राम आगलावे, यांनी या रस्त्याला योग्य दर्जाचा डांबरीकरण व खडीकरण करून रस्ता करावा अशी मागणी करत आहेत रस्ता जर व्यवस्थित नाही झाल्यास पुढील व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ शकेल अशी माहिती ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच सुभाष ढोके, सदस्य दिपक विश्राम आगलावे, सावंगा जहागीर येथील ग्रामपंचायत सर्व सदस्य गावकरी मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments