⭕ *शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या पद यात्रेमध्ये सहभागी व्हावे...सह संपर्कप्रमुख विश्वनाथ सानप यांचे आव्हान...*⭕

 


( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )





        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ फेब्रुवारी गुरुवार:-  वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वात मातृतिर्थ सिंदखेडराजा ते शिवतीर्थ शिवाजी पार्क मुंबई अशी *मुक्त संवाद पदयात्रा* दि. 30 जानेवारी2024 पासून सुरू झाली असून दि. 2 फेब्रुवारी 2024 ला रिसोड तालुक्यातील संत सखाराम महाराज लोणी येथून सुरू होत असून मोप येथे  मुक्त संवाद पद यात्रेचा मुक्काम आहे व दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ला मोप पासून रिसोड पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम करीत रिसोड शहरांमध्ये येणार आहे. सद्यस्थितीत देशातली लोकशाही  पायदळी तुडवली जात आहेत. पुरोगामी विचारांना एक प्रकारे तिलांजली दिली जात असल्याचे वातावरण देशात आणि राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी पुरोगामी विचारा चा जागर आणि गजर करण्यासाठी जिजाऊ च्या सावित्रीच्या लेकी रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यानिमित्त ही पदयात्रा रिसोड तालुक्यातून व शहरातून जाणार आहे यात्रेमध्ये सुषमाताई अंधारे समवेत राज्य पातळीवरील शिवसेना पक्षाचे नेते उपनेते जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजानन देशमुख, उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख  , नारायण आरु तालुकाप्रमुख ,उपतालुकाप्रमुख प्रकाश तात्या चोपडे,अशोक अंभोरे ,मंगला सरनाईक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार असून रिसोड तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नारायण आरु  यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments