⭕ *मेहकर येथे तथागत ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर व समाजभुषण पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न...*⭕

 
















 ( बुलढाणा / मेहकर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕  बुलढाणा / मेहकर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ जानेवारी सोमवार:- बुलढाणा जिल्हयातील मेहकर स्थानिक मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच जानेफळ एक्सप्रेसच्या दिनदर्शिका प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कांतादेवी डाळे ब्लड सेन्टर व त्यांच्या टीमच्या सहकार्याने मेहकर शहरातील जवळपास ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच तथागत ग्रुपला राज्यभर वाढविण्यासाठी ज्या पदाधिका-यांनी अहोरात्र मेहनत केली अशा पदाधिकाऱ्यांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने तथागत ग्रुपचे गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी,राधेश्याम खरात,सचिन गवई,दुर्गादास अंभोरे,महादेव मोरे,संदिप राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासणारे मेहकर शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेंद्र शिंगटे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने व प्रमुख मार्गदर्शक म्हणून तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई आदींची कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी ॲड.देवकांत मेश्राम,संतोष खरात,कुणाल माने, सुनिल वनारे,पत्रकार फिरोजभाई शाहा,शोएब अली,जफरभाई शाहा,संजय वानखेडे या सर्व मान्यवरांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण केले..याप्रसंगी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई,सेवाशक्ती टाईम्सचे मुख्यसंपादक अंकुश राठोड, अंजनी बु चे उपसरपंच गजानन सरकटे, पत्रकार प्रकाश सुखधाने,गौतम नरवाडे,राधेशाम खरात,सचिन गवई,अख्तर कुरेशी,दुर्गादास अंभोरे,महादेव मोरे,गौतम पैठणे,संदिप राऊत,रुपेश गवई,गणेश वानखेडे,राम डोंगरदिवे,श्रीकृष्ण शेटाणे,नितीन बोरकर,अनिल धांडे,महिला आघाडीच्या सौ.निता पैठणे,सौ.कांचन मोरे,सौ.वंदना माने,सौ.लक्ष्मी कस्तुरे,सौ.राधा यंगड यांच्यासह तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मेहकर शहरातील युवक बहूसंख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments