( वाशिम जिल्हा प्रतिनीधी : - अजय गायकवाड )
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० जानेवारी मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचा मालेगाव तालुक्यातील सर्कल दौरा जिल्हाध्यक्ष किरणताई गिर्हे यांच्या अध्यक्षतेखाली दि ३० जानेवारीला होत आहे. या दौऱ्याला राष्ट्रीय नेत्या आदरणीय प्रा अंजलीताई आंबेडकर, प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हा प्रभारी अरुंधतीताई सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दौऱ्यामध्ये ऍड श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर हे पदाधिकारी तथा तळागाळातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेच्या सर्व बहुजन, गरीब मराठा, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्यांक बांधवानी तसेच वंचित बहुजन आघाडी , महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मालेगाव तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सर्कल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या सर्कलमध्ये उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडी तथा श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार यांच्या वतीने करण्यात येत आहे .
"दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे"
मालेगाव तालुका दिनांक ३० जानेवारी २०२४
१) ब्राम्हणवाडा सर्कल -
कार्यक्रमाचे ठिकाण - ग्राम - हनवतखेडा - वेळ सकाळी - ११.३० वाजता
२) जउळका रेल्वे सर्कल- ग्राम जोडगव्हाण
वेळ दुपारी १. ०० वाजता
३) राजुरा सर्कल- कार्यक्रमाचे ठिकाण- ग्राम - कुरळा
वेळ दुपारी - ३. ०० वाजता
४) मेडशी सर्कल- कार्यक्रमाचे ठिकाण - ग्राम - मेडशी
वेळ सायं - ५. ०० वाजता
सायंकाळी ७ वाजता अकोला कडे प्रयाण.
