⭕ *वाशीम श.पो.स्टे.चे ठाणेदार ठाकूर साहेब यांना तात्काळ निलंबित करा. ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना ची मागणी...*⭕

 

 


( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : - अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम  / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३१जानेवारी बुधवार: वाशीम जिल्ह्य़ातील स्थानिक वाशिम येथील ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर सर यांच्या नेतृत्वात आणि लाखाळा स्थित रहीवसियांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांना वाशीम चे वादग्रस्त ठाणेदार ठाकूर साहेब यांना तात्काळ निलंबित करावे अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, लाखाळा स्तिथ गेल्या 30 ते 35 वर्षापासून उभा असलेला पंचशील ध्वज त्या ठिकाणी असलेल्या विशिष्ठ समाजाच्या गटाने न. प.चे अधिकारी यांना हाताशी धरून काढून घेतला.यामुळे दुसऱ्या गटाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.परंतु अश्या वादग्रस्त ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या फौजफाट्यास वाशीम शहर पो.स्टे.चे वादग्रस्त ठाणेदार ठाकूर साहेब हे तिथे येतात आणि त्या रहीवासियाना आडवे येसाल तर तुम्हाला आडवे करू असे वादग्रस्त वक्तव्य केले.यावरून दोन्हीही गटाच्या लोकांना समजावून सांगण्या ऐवजी हे ठाणेदार विशिष्ठ समाजाच्या  दबावाखाली कार्य करीत असून त्यांना या संविधानीक पदावर काम करण्याचा काहीच अधिकार नाही.तरी या वेळी न . प.चे मुख्याधिकारी साहेब यांना या ठिकाणी घेऊन आलेल्या ठाकूर साहेब यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी वाशीम जिल्ह्याचे  जिल्हा पोलिस अधीक्षक अनुप तारे साहेब यांना आली आहे.यावेळी ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे आशिष कोकरे, संविधान ढोले , सचिन भाऊ राऊत,अक्षय इंगोले, विशाल मुंढे,सोनु मनेर,नितीन बांगर,दिलीप भाऊ गायकवाड , यांच्या सह लाखाळा येथील महिला व पुरुष तसेच सर्व रहिवासी यांची उपस्थिती होती.;

Post a Comment

0 Comments