( अमळनेर शहर प्रतिनिधी:- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ जानेवारी शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शेडनेट पॉली हाऊस कथित घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तक्रारदारांनी स्वतःला जमिनीत गाडून केले आंदोलन. महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या अनुदानित शेडनेट,पॉली हाऊस उभारणीत जळगांव,धुळे, नंदुरबार, अ.नगर,नाशिक आदी ठिकाणी करोडोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमळनेर येथील सचिन बाळू पाटील,अनंत निकम यांनी केला आहे.केंद्र व राज्य सरकारने साडे चार कोटी चे कर्ज जागतिक बँके कडून घेऊन दुष्काळी गावां मध्ये सदर योजना सन २०१९ ते २०२३ दरम्यान राबविण्यात आली.यात गरीब,गरजू शेतकऱ्यांचे दर्जेदार उत्पन्न व्हावे,या धोरणाने राबविण्यात आली होती परंतु शेडनेट, पॉली हाऊस उभारणीत कंपनी/ठेकेदार यांनी काही दलालानां हाताशी धरून अनेक ठिकाणी फक्त कागदी पत्री शेडनेट ,पॉली हाऊस उभारणी केल्याचे आढळून आले,योजने अंतर्गत दरपत्रक प्रपोजल प्रमाणे साहित्य वस्तुस्थिती आढळून आले नसल्याने यात कृषी अधिकारी या भ्रष्टाचार करण्यात लिप्त आहे,तसेच ठेकेदारांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आमिष देवून उभारलेले शेडनेट,पॉली हाऊस ३ महिन्यात अथवा १-२ वर्षात काढून घेतले यामुळे शेतकर्यांवर बकेंचा बोजा वाढला,सदर अवास्तव कर्ज शेतकऱ्यांवर लादणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व कमी क्षेत्रा वर कर्ज देणाऱ्या बँके व बँकेतील अधिकारी हे जबाबदार आहे,ट्रेनिंग क्या नावाखाली बनावट कागदपत्र जोडल्याने शेतकरी प्रशिक्षण वंचित राहिल्याने फसगत झाली,शेतकऱ्यांच्या खात्यातून मंजूर कर्ज,शासकीय अनुदान संमतीपत्र किंवा ना हरकत दाखल न घेता संबंधित कंपनी,ठेकेदार,दलालानी कृषी खात्यातील व काही अशासकीय मंडळी यांच्याशी संगनमत करुन सदरचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर काढून घेतला असल्याचा आरोप करीता सदर घोटाळ्याची कसून चौकशी व्हावी व संबधित भ्रष्टाचारी लोकांवर गुन्हे दाखल व्हावे व सन २०१८ - १९ मध्ये सध्याचे कृषी उप्तन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार यांनी शेडनेट नउभारता अनुदान लाटल्याने त्यांच्या सह कृषी अधिकारी यांच्या वर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा,यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सचिन बाळू पाटील, अनंत निकम व कैलास दगा पाटील यांनी तहसील कार्यालयावर समोर स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले.आंदोलन स्थळी तहसीलदार सुराणा व कृषी अधिकारी ठाकरे यांनी आंदोलकर्त्यांनां याबाबत पंधरा दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले.या प्रसंगी आंदोलकांना समर्थ देण्यासाठी अनेक शेतकरी उपस्थित होते.


