⭕ *प्रेझेंटेशन मध्ये पाच हजार वैद्य मधून आभा प्रथम...*⭕



( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: ०२ जानेवारी मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील   मालेगाव येथील सेवानिवृत्त प्रा.राध्येश्याम पनपालीया यांची मुलगी कु.आभा  पनपालीया ही "जागतिक आयुर्वेद कुम्भ" हरिद्वार येथे आयोजित 'पोष्टर प्रेझेंटेशन' प्रशिक्षणात पाच हजार वैद्य मधून  प्रथम आली आहे.डॉ आभा हिने मायग्रेन या आजारा बद्दल पोष्टर प्रेझेंटेशन सादर केले आहे.हरीद्वार येथे संपूर्ण भारतातून पाच हजार आयुर्वेदिक डॉक्टर त्यात  सहभागी झाले होते.त्यात तिच्या मायग्रेन आजाराबद्दल विस्तृत माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले.आभाच्या कार्याची दखल येथील भारतातील व परदेशातील डॉक्टर यांनी घेतली व तीला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.तिच्या या यशा बद्दल मालेगाव शहरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी  तीचं  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments