( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ जानेवारी रविवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेर येथील नूतन माध्यमिक विद्यामंदिर साने गुरुजी कन्या हायस्कूल आणि साने गुरुजी विद्या मंदिर,अमळनेर या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण दिनेश बागडे ( पँरा पावर लिफ्टींग कांन्स पदक विजेता ) यांच्या हस्ते करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये प्रथमतः *मेरे झोपडीके भाग आज खुल जायेंगें राम आयेंगे,संदेसें आते है,या गीतां साठी श्री.मनोहर पाटील सर,श्री.चिंतामण धनके सर यांनी मेहनत घेतली. कवायती चे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले यासाठी सौ.मोनिका पाटील मँडम मेहनत घेतली. तसेच मागील वर्षी ज्या विद्यार्थानी विविध स्पर्धेत यश संपादन केले त्यांचा,सत्कार आणि स्वागत करण्यात आले.कार्यक्रम वेळी व्यासपीठावर श्री.हेमकांत ( सागर) पाटील ,(अध्यक्ष,) श्री गुणवंतराव पाटील, (उपाध्यक्ष ) श्री.संदिप घोरपडे सर ( चिटणीस) श्री.अँड अशोक बाविस्कर (सह चिटणीस) श्री भास्कर बोरसे, श्री शेख शकिल जलाल्लोद्दिन ,श्री.महाजन ,श्रीमती अनिता बोरसे मँडम, श्री संजय पाटील सर श्री.संजीव पाटील सर ,पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात आदरणीय संदिप घोरपडे सर यांनी समायोजित शिक्षकांचा यथोचित परिचय करून दिला आणि मार्गदर्शन केले.

