( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मालेगाव पोलिसांना नागपूरहून कतली साठी गोवंशानी खचाखच भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी तीस ते पस्तीस गोवंशाचा भरणा असलेला ट्रक मालेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर पकडला. पकडण्यात आलेल्या ट्रक मधील गोवंश शिरपूर येथील अंतरिक्ष गो शाळेमध्ये सोडण्यात आल्या. ट्रक मधील काही गोवंश दगावल्या सुध्दा आहेत नागपूरहून समृद्धी मार्गे ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ३३८२ हा खचाखच गोवंश भरून निघाला होता. हा ट्रक सोमवारी चार ते साडेचार वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल नाक्यांवर आला. याची गुप्त माहिती एका वाहन चालकाकडून मालेगाव पोलिसांना मिळाली. त्यावरून ट्रक चालक घाबरून नियोजित मार्गाने न जाता पुन्हा आलेल्या दिशेनेच परत जात होता. मात्र, पोलिसांना मिळाल्या माहितीने मालेगाव पोलिसांनी सतरक्ते ने तात्काळ तीस ते पस्तीस गोवंश भरलेला ट्रक पकडला. ट्रक मध्ये असलेले गोवंश शिरपूर येथील अंतरिक्ष गो शाळेमध्ये आणण्यात आले. ट्रक गोवंशाने गच्च भरलेला असल्याने त्यापैकी काही गोवंश गुदमरून मृत्युमुखी पडले आहेत. सदर कारवाई मालेगाव चे ठाणेदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक .स्वप्नील तायडे.व संतोष इंगळे पोलीस कर्मचारी कैलाश कोकाटे.,सुनील पवार.,जितू पाटील., राजू महाले.आदींनी केली तसेच ट्रक मधील गोवंश काढण्यासाठी शिरपूर येथील युवक मंडळींनी मोठे परिश्रम घेतले.


