⭕ *मंगरूळपीर पोलिसांनी पकडला अकोला रस्त्यावर भरलेला ट्रक गायींची वाहतूक करणाऱ्या वर गुन्हा दाखल...*⭕

 


    ( मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी:-अनंता घुगे )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ वाशिम / मंगरुळपीर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार मंगरूळपीर : - मंगरूळपीर पोलिसांना कसली साठी गोमाशानी भरलेला ट्रक असल्याचे गुप्त माहिती मिळाली.अकोला रस्त्यावर मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता वाहन क्र. एमएच ३६ ए ए३५३० या वाहनाची पाहणी केली असता त्यात गाडीच्या पाठीमागे जनावरे असल्याचे दिसले. गाडीच्या कॅबीनमध्ये १ मोबाइल कि. ५००० आढळून आला. या गाडीत एकूण १० गायी, १ गोऱ्हा अशी ११ जनावरे एकूण किंमत अंदाजे ७० हजार रुपये अशी जनावरे दाटीवाटीने पाय बांधून कोंबून ठेवल्याचे आढळून आले. सदर कारवाई मंगरूळचे ठाणेदार   यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. असा एकूण ७५ हजारांचा माल आढळल्याने वाहन चालकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments