(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील शिरपुर जैन येथे मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान लावण्यात येणारे डिजे व डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने अनेक दुर्घटना घडल्या ही बाब लक्षात घेता शिरपुर जैन शहर हे डिजे डॉल्बी मुक्त करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत २२ डिसेंबर झालेल्या शांतता समितीच्या सभेत तसा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या सभेत शिरपुर जैन ला डिजेमुक्त करण्यासाठी सर्व उपस्थितांनी सहमती दर्शवली . ग्रा. पं. च्या मासिक सभेत व ग्रामसभेतदेखील तसा ठराव घेण्यात येईल असे सत्ताधारी गटाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर उल्हामाले कृउबास संचालक विजय अंभोरे , माजी पं स. सदस्य अशोक देशमुख , गोपाल वाढे , शंकर वाघ , कैलास भालेराव , शाम दिक्षित , नंदकिशोर गोरे, मोईब खा पठाण , गोपाल जाधव , यांनी विचार व्यक्त केले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष भालेराव , प्रदिप देशमुख , संतोष आढागळे , असलम परसुवाले , ज्ञानेश्वर गावडे , दस्तगीर पहेलवान , गजानन देशमुख , सतीश तोटेवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनी महेश मछले यांनी केले.
