⭕ *शासकीय विश्राम भवन मालेगाव येथे आज नियोजन बैठकीचे आयोजन...5 डिसेंबरला मनोज जरांगे यांची होणार आहे जाहीर सभा...*⭕




( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕  वाशिम / मालेगाव  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:- वाशिम जिल्ह्यातील  मालेगाव  येथील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील  यांच्या जाहीर सभेचे आयोजन वाशिम जवळील काटा येथे ५ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. याबाबत मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विश्राम भवन मालेगाव येथे नियोजन बैठकीचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या बैठकीला तालुक्यातील  मराठा बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.मराठा समाज हा मुळचा कुणबीच असल्याचे आता अनेक पुराव्यानिशी सिध्द झाले आहे .आणी कुणबी हे ओ बी सी प्रवर्गामधे आहेत .परंतु काही गावामधे कुणब्यांच्या नोंदी मिळत नसल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही . त्यामुळे समाजाचे सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे . विशेषता शिक्षण व नोकऱ्यांमधे मराठा समाजातील विद्यार्थी  प्रचंड पिछाडीवर गेले आहेत . एक भाऊ मराठा तर दुसरा कुणबी तसेच पती कुणबी तर पत्नी मराठा , अशी परिस्थीती अनेक ठिकाणी बघायला मिळत असल्याने मराठा व कुणबी हे एकच असल्याचे सिद्ध होते . परंतु शासनाने कुणबी ओबीसी मधे तर मराठा मात्र खुल्या प्रवर्गात टाकला आहे . त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओ बी सी आरक्षण देण्यात यावे. या मागणी साठी संपुर्ण महाराष्ट्र मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा झाला आहे . मराठा समाजाला जागे करण्यासाठी त्यांच्या महाराष्ट्रभर लाखोंच्या संखेने सभा होत आहेत .वाशिम जिल्ह्यामधे काटा या गावामधे देखील मनोज पाटील जरांगे यांच्या सभेचे भव्य आयोजन ५  डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या सभेमध्ये प्रत्येक गावातील मराठ्यांनी लाखोंच्या संखेने सहभागी झाले पाहीजे . असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे . त्या सभेच्या आयोजनाच्या दृष्टीने मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालेगाव तालुक्यातील   सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची नियोजन सभा मालेगाव येथील रेस्ट हाऊसवर आयोजित केली आहे .या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments