⭕ *शिक्षकांनीच अल्पवयीन मुलीवर केला विनयभंग...पोलीसानी केली अटक...*⭕

 

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

      [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३१ ऑक्टोबर मंगळवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील ग्राम सुदी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गाडगेनगर मालेगाव येथील शिक्षक किशोर रामभाऊ चाफेविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी शिक्षकाची रवानगी वाशिम कारागृहात केली आहे...पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आई वडिलांनी गाडगेनगर येथे खोली भाड्याने घेतली होती. काही दिवसांनी शिक्षक किशोर चाफे हा त्यांच्या घरी येऊ लागला. १६ जुलै २०२३ रोजी तो घरात आला व तू मला खूप आवडते व माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे म्हणून हात धरला व माझ्यासोबत फोटो काढ, नाही तर तुला व तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे मी घाबरले व त्याच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर एक दिवस तो आमच्या गावी येऊन सुदी येथील नातेवाईक प्रवीण राऊत यांना फोटो दाखवले. आई- वडिलांनी याबाबत मला विचारले असता, ही बाब त्यांना सांगितली. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी मालेगाव पोलिसांना दिली. यावरून आरोपी किशोर रामभाऊ चाफेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाशिम न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. पुढील तपास ठाणेदार दतात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप राहते करीत आहेत.

Post a Comment

0 Comments