⭕ *मालेगांव येथील शेतात विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू !...*⭕

 

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० ऑक्टोबर सोमवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील युवा शेतकरी दुपारी शेतात गेला असता,शेतातील धरनातील मोटर पंप लावण्याच्या नादात त्याला विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार,२९ अक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली अमोल रमेश कुटे (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे...मालेगाव येथील घटना कुशल युवा शेतकरी अमोल रमेश कुटे हे त्याच्या भेरा रोडला असलेल्या शेतामध्ये काम करते वेळी विद्युत प्रवाह चा जोरदार धक्का लागल्याने अमोल कुटे यास त्याला शासकीय ग्रामीन रुग्णालय मालेगाव येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले अमोल कुटे पश्चात आई वडील पत्नी तीन मुली एक मुलगा व दोन भाऊ असा आप्त मोठा परिवार आहे या दुरदैवी घटलेल्या घटनेमुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी मालेगांव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून,पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments