(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
⭕ वाशिम / मालेगाव (लोकतक समाचार) दि:२६ ऑगस्ट शनिवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम.मालेगाव येथील तहसील कार्यालया जवळ बोरगाव रोड वरील श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथ शाळा मालेगाव येथे रक्षाबंधन निमित्त राखी बनविणे कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना गवई , प्रमुख मार्गदर्शिका पुजाताई टनमने, इश्वरीताई बळी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या . सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेची पूजन करून व हार अर्पण करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मार्गदर्शिका पूजाताई टनमने, ईश्वरिताई बळी यांनी विद्यार्थ्यांना राखी कशी बनवावी याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून आकर्षक राख्या तयार करून घेतल्या यावेळी शाळेतील वर्ग 1 ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला व वेगवेगळे आकर्षक साहित्य वापरून त्यांनी राख्या तयार केल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुषमा देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
