(नाशिक जिल्ला:मानद प्रतिनिधी:अँड.सुरेन्द्र सोनवणे)
👉नाशिक (नाशिक):दि:२३ माचँ गुरुवार:-नाशिक शहरातील श्रीराम मंदिर, जनक नगरी, आम्रछाया व वरद सोसायटी तर्फे श्रीराम जन्मोत्सवा निमित्ताने ७ दिवस भव्य संगितमय पुण्य श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
👉नवीन नाशिक, खुटवड नगर जनक नगरी येथील श्रीराम मंदिरात दि. २३ मार्च २०२३ ते दि. २९ मार्च २०२३ या ७ दिवस चालणाऱ्या भव्य संगीतमय श्रीराम कथा सोहळा प्रवक्ते शिवमहापुराण कथाकार व रामकथाकार श्री ह. भ. प. सोपान महाराज रावळगावकर यांच्या सुमधुर रसाळ वाणीने पार पडणार आहे.
👉तसेच राम नवमी गुरूवार दि. ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ८ ते १० वा. पर्यंत नगर प्रदक्षिणा व भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी १२ वा. श्रीराम जन्मोत्सव व महाआरती होईल. दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
👉सदरच्या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास अँड. मा. श्री. तानाजी आप्पा जायभावे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. तरी श्रीराम भक्तांनी या राम कथा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राम कथा आयोजन समितीच्या वतीने श्री. दिलीप सुर्यवंशी, श्री. भगवान पंडित, श्री. कदम सर, अँड. सुरेन्द्र सोनवणे, श्री बबन सानप, श्री. समाधान जायभावे, 👉अँड. सुनील सामले, श्री. भाउसाहेब इखे, श्री गावंडे, श्री सतीष वाणी, श्री. सावळे, श्री. घोडके, श्री योगेश व्याळीज, श्री. कपिले, श्री. पंढरिनाथ इलग, श्री सुभाष हिरे, श्री पवन पुणतांबेकर, श्री. जी. पी. खैरनार, श्री बबनराव जाधव, डॉ. अभय कुलकर्णी, श्री मांगले, श्री रमेश बहिरम, श्री रमेश वाघ, श्री प्रविण फिरके, श्री गोकुळ पवार, श्री ज्ञानेश्वर जगताप, श्री राजाभाऊ बसे श्री चंद्रकांत खैरनार, श्री. विनोद अहिरे, श्री. बबन घुगे यांनी कळविले आहे. ⭕➖➖➖⭕️➖➖➖⭕