👉मालेगाव-(वाशिम):-दि:३० माचँ गुरुवार:-मालेगाव हॅलो..मी मंगेश बोलतोय...मी विष प्राशन करून आत्महत्या करत असल्याचा कॉल
112 आपत्कालीन सहायता क्रमांकावर आला... लगेच या बाबतची माहीत जिल्हा पोलिस मुख्यालयातून मेडशी पोलिस चौकी येथे कार्यरत जमादार पांचाळ यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली.
मंगेशने भ्रमणध्वनी बंद केल्याने पोलिसांची त्याच्या शोधार्थ दमछाक झाली...अखेर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मंगेशचा शोध घेत त्याचे प्राण वाचविल्याची घटना दिनाक 30 मार्च रोजी घडली
👉सविस्तर वृत्त असे की, वाशिम तालुक्यातील देपुळ येथील मंगेश माणिक गंगावणे वय वर्ष 24 पत्नीला भेटायला मालेगाव तालुक्यातील सासरवाडी असलेल्या मारसुळ येथे गेला. सासुरवाडीच्या मंडळीसोबत त्याची कौटुंबिक वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्याने रागारागात विष प्राशन करून आत्महत्या करत असल्याची माहिती 112 आपत्कालीन सहायता क्रमांकावर दिली. लगेच याबाबतची माहिती मेडशी पोलिस चौकी येथे कार्यरत पोलिस जमादार गजानन पांचाळ यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस जमादार पांचाळ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह मारसुळ , ब्राम्हणवाडा परिसरात शोध घेतला असता मंगगेशचा शोध लागत नव्हता. त्याचा भ्रमणध्वनी बंद अवस्थेत येत होता .तेव्हा पोलिस जमादार पांचाळ यांनी वाशिम येथील सायबर सेलला कॉल रून लोकेशनचा शोध घेण्याचे सांगितले असता तेथील कार्यरत पोलिस कर्मचारी दिपक घुगे यांनी क्षणाचा विलंब न लावता लोकेशन ट्रेस केले.अखेर पोलिसांना मंगेशचा शोध घेण्यास यश आले. पोलिसांनी त्याला ब्राम्हणवावाडा नाजिक मारसुळ शेत शिवारातून पकडले. पोलिसांनी त्याच्या हातातून विषारी द्रव्याची बॉटल हिसकावून घेत त्याचे वाचविला.
👉मंगेशला मेडशी पोलिस चौकीत आणण्यात आले. सदर घटनेची माहिती मंगेशच्या सासरच्या मंडळीला देण्यात आली.
अखेर मंगेश आणि सासरच्या मंडळीत समेट घडला आणि ते मंगेशला सोबत घेवून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
👉सदर कार्यवाहीत जमादार गजानन पांचाळ,पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, होमगार्ड गणेश तागड ,पोलिस मित्र वैभव तायडे यांचा सहभाग होता.
तरुणाचे प्राण वाचविल्याने मेडशी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केल्याने पोलिसांची त्याच्या शोधार्थ दमछाक झाली...अखेर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मंगेशचा शोध घेत त्याचे प्राण वाचविल्याची घटना दिनाक 30 मार्च रोजी घडली
👉सविस्तर वृत्त असे की, वाशिम तालुक्यातील देपुळ येथील मंगेश माणिक गंगावणे वय वर्ष 24 पत्नीला भेटायला मालेगाव तालुक्यातील सासरवाडी असलेल्या मारसुळ येथे गेला. सासुरवाडीच्या मंडळीसोबत त्याची कौटुंबिक वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्याने रागारागात विष प्राशन करून आत्महत्या करत असल्याची माहिती 112 आपत्कालीन सहायता क्रमांकावर दिली. 👉लगेच याबाबतची माहिती मेडशी पोलिस चौकी येथे कार्यरत पोलिस जमादार गजानन पांचाळ
यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस जमादार पांचाळ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह मारसुळ , ब्राम्हणवाडा परिसरात शोध घेतला असता मंगगेशचा शोध लागत नव्हता. त्याचा भ्रमणध्वनी बंद अवस्थेत येत होता . 👉तेव्हा पोलिस जमादार पांचाळ यांनी वाशिम येथील सायबर सेलला कॉल करून लोकेशनचा शोध घेण्याचे सांगितले असता तेथील कार्यरत पोलिस कर्मचारी दिपक घुगे यांनी क्षणाचा विलंब न लावता लोकेशन ट्रेस केले.अखेर पोलिसांना मंगेशचा शोध घेण्यास यश आले. पोलिसांनी त्याला ब्राम्हणवावाडा नाजिक मारसुळ शेत शिवारातून पकडले. 👉पोलिसांनी त्याच्या हातातून विषारी द्रव्याची बॉटल हिसकावून घेत त्याचे वाचविला.
मंगेशला मेडशी पोलिस चौकीत आणण्यात आले. सदर घटनेची माहिती मंगेशच्या सासरच्या मंडळीला देण्यात आली.
अखेर मंगेश आणि सासरच्या मंडळीत समेट घडला आणि ते मंगेशला सोबत घेवून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
👉सदर कार्यवाहीत जमादार गजानन पांचाळ,पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, होमगार्ड गणेश तागड ,पोलिस मित्र वैभव तायडे यांचा सहभाग होता.
तरुणाचे प्राण वाचविल्याने मेडशी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.