*श्री संत जमाल बाबा संस्थान येथे भव्य महाप्रसाद हजारों भाविकांनी घेतला लाभ*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड


मालेगाव तालुक्यातील मारसुळ पासून चार किलोमीटर अंतरावर असलेले श्री संत जमाल बाबा संस्थान आहे.येथे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसादाचे व यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.अतिशय निसर्गरम्य व दाट जंगल वस्तीत हे संस्थान असून येथे काही मनोकामना मागितल्यास त्या पूर्ण होतात असा येथील भक्तांचे म्हणणे आहे.आणि त्या पूर्ण होतातच अशी येणाऱ्या भाविकांना प्रचिती येते. त्यामुळे दरवर्षी येथे येणाऱ्या भाविक भक्तांचा आलेख हा वाढताच आहे.त्यामुळे माघ कृ 7 रविवार पासुन येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते.तर भागवतांचे वाचन ह भ प बळीराम धन्नू राठोड यांच्या कडून होत असते.तर विनेकरी ह भ प प्रल्हाद आघाव व ह भ प धनराज मेटांगे हे असतात. यावर्षी जवळपास 15 क्विंटल भाजी व पुरीचा भव्य असा महाप्रसाद बनवण्यात आला होता. आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या महाप्रसादाला हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती.तसेच परिसरातील राजकीय,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुद्धा या महाप्रसादाला उपस्थिती लाभली होती.या महाप्रसादाचे आयोजन व व्यवस्थापन श्री संत जमाल बाबा संस्थान मारसूळ व पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी मिळून मोठ्या आनंदाने व उत्साहाने करत असतात.

Post a Comment

0 Comments