*' मुबई,ठाणे येथील शिव जयती निमित्त "गारद फाऊंडेशन" तर्फे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे, महाराष्ट्र राज्य सदस्य प्रखड वक्ते श्री.विपुल आढाव यांचा कृतज्ञता पूर्वक सन्मान....*


(ठाणे/मुंबई:प्रतिनिधी:संदीपभाऊ गवई)

मुंबई (ठाणे):--दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ' गारद फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ' व शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अभिव्यक्त शब्दांची रत्ने या आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य श्री.विपुल उत्तम आढाव यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला आणि त्यातील मुख्य कौशल्य याबाबत योग्य व अचूक मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षण घेत असताना सामाजिक , सांस्कृतिक ,भावनिक विकास होणे गरजेचे असते, त्यासाठी अशा कला व कौशल्यांचा परिपोष करणे महत्त्वाचे असते असे सांगत आयोजकांचे कौतुक केले.परीक्षकाची धुरा अचूकपणे सांभाळल्याने फाऊंडेशन तर्फे त्यांचा यथायोग्य सन्मान करण्यात आला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विपुल आढाव यांच्या सह सौ. मानसी जंगम ह्या सुद्धा परीक्षक होत्या. 

सदर कार्यक्रमासाठी एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लहान गटासाठी (इयत्ता पाचवी ते सातवी) परीक्षक सौ.गीता दाते 

आणि सौ.भारती जोशी तर मोठ्या गटासाठी (इयत्ता आठवी ते दहावी) परीक्षक म्हणून श्री. विपुल आढाव आणि सौ.मानसी जंगम कार्यरत होते.

विद्यार्थ्यांसह फाऊंडेशनचे सर्व सदस्य,पदाधिकारी,शिक्षक,पालक तसेच अनेक शिवभक्त श्रोते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर त्यांच्या भावना आणि विचार मांडून दादा कोंडके ॲम्पी थिएटर येथे स्नेहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न केला..

Post a Comment

0 Comments