सिल्लोड:-दि.२१ :-सोयगाव शिवजयंती मिरवणूक पारंपरिक पध्दतीने हातातील भगवे झेंडे,डोक्यावरील फेटे घातलेल्या हजारो शिवभक्तांच्या प्रचंड जल्लोषात मोठ्या थाटामाटात भवानीमाते चे मंदीर ते छ.शिवाजी महाराज चौकापर्यंत संपन्न झाली.हजारोंचा संख्येने शिवभक्तांनी भव्य दिव्य मिरवणूकीने सोयगावक रांचे लक्ष वेधले. सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष बंटी भाऊ काळे व रामु चौधरी यांनी प्रशासनाचे व मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मानण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे व बी.बाईज चे सभासद युवा परिवाराने अथक परिश्रम घेऊन मिरवणूक यशस्वी केली.