वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव- पथदिव्यांचे लोखंडी खांब तुकडे करून भंगारात विकत असतांना चोरट्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या कडुन १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी मालेगाव पोलीसांनी ३०जानेवारी रोजी सायंकाळ दरम्यान केली. मालेगाव शहरातील एका भंगार दुकानावर चोरीचे लोखंडी खांब विकण्यासाठी अज्ञात व्यक्ती येत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलीसांना मिळाल्या वरून मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सुधाकर गंधे यांनी
पोलीस कॉंस्टेबल अमोल पाटील
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी सैबेवार पोलीस हेड काॅस्टेबल कैलास कोकाटे, प्रशांत वाढणकर यांच्या सहका-या समवेत शहरात शोध घेतला असता मालेगाव तहसील नजिकच्या नविन बस स्टॅन्ड जवळील एका भंगार दुकाना कडे चारचाकी मालवाहू पिक अप गाडी ज्यामध्ये पथदिव्यांचे लोखंडी खांबाचे तुकडे घेवुन जातानी दिसली.यावेळी सदर गाडीचा पाठलाग केला असता गाडी थेट एका भंगार दुकाणा समोर आढळून आली असता भंगार दुकानात जावून सदर पिक अप गाडीचा चालक सोहेल खान अयाजखान व त्याचा साथीदार विशाल विष्णू नानोटे यास विचारपुस केली असता त्यांनी गाडीतील लोखंडी खांबाचे कोणत्याही प्रकारचे बिल किंवा इतर कोणतेही कागदपत्रे दाखविले नाहीत त्यानुसार मालेगाव पोलीसांनी पिक अप गाडी क्रमांक एम एच ३७ टि २२५३ किमंत ९लाख रुपये व १३ लोखंडी पोलचे तुकडे किमंत अंदाजे ७८हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला त्यासोबतच चोरट्यांनी तामसी रोडने सुद्धा आणखी चोरीचा माल लपवल्याचे समजल्या वरून तामसी फाटा येथील घटना स्थळा वरुन सहा लोखंडी खांबाचे तुकडे किमंत ३६हजार रुपये व अखंड आठ लोखंडी खांब किंमत अंदाजे ८०हजार रुपये असा एकूण १०लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.सदर प्रकरणी मालेगाव पोलिसांनी कलम 41(1)(ड) जा. फो. प्रमाणे कायमी करण्यात आली असुन घटनेच्या अधिक तपासासाठी आरोपींना वाशिम ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गंधे यांनी दिली.


