अमळनेर:(जळगाव)अमळनेर:प्रतिनिधी:-आत्माराम आहीरे
अमळनेर:-तालुक्यातील पातोंडा ग्राम पंचायतीत ग्रा.पं.ठराव 28/03/2002 रोजीनुसार राकेश विलास पाटील या उमेदवाराची ग्रा.पं.कारकून कम लिपिक म्हणून करण्यात आलेली पदभरती ही महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र.प्रानिम 1215/प्र.क्र.109/15/13-अ,दि. 05,ऑक्टोबर 2015 मधील तरतुदी व अटीनुसार झालेली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन ढीवरे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणले असून सदर पदभरती ग्राम पंचायतीने रद्द न केल्यास वरीष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगत त्याबाबतचे निवेदन त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा कोरमअभावी न झाल्याने येत्या सात दिवसांत पडभरतीचा मुद्दा पुन्हा दुसऱ्यांदा गाजणार आहे.
दि.14/02/2020 रोजी ग्रा.पं.ने गावात लावण्यात आलेल्या पदभरती जाहिरातीनुसार एकूण 12 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी ग्रा.पं.ने 07 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवलेले होते.दरम्यान ग्रा.पं.मधील काही पदाधिकारी यांनी संगनमत करून अक्षय नेहरू पवार ह्या उमेदवाराची लिपिक म्हणून ग्रा.पं.ठरावानुसार निवड केली होती.त्यापैकी काही ग्रा.पं.सदस्यांनी विरोध केला होता. दरम्यान विरोध करणारे सदस्य व काही उमेदवारांनी सदर भरती अवैध असल्याबाबत तत्कालीन गटविकास अधिकारी अमळनेर यांना निवेदेन दिले होते.दिलेल्या निवेदनानुसार सदर भरतीबाबत तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष कागदांची पडताळणी करून सदर भरती हि महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र.प्रानिम 1215/प्र.क्र.109/15/13-अ,दि. 05,ऑक्टोबर 2015 मधील तरतुदी व अटीनुसार झालेली नसल्याची टिप्पणी देत दि.10/08/2020 रोजी सदर भरती रद्द करण्याचे पत्रान्वये आदेश दिलेत. व सदर भरतीची नवीन प्रक्रिया हि महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र.प्रानिम 1215/प्र.क्र.109/15/13-अ,दि. 05,ऑक्टोबर 2015 मधील तरतुदी व अटीनुसार करण्यात यावे असे हि ठळकपणे नमूद केले.
पण, सदर भरती नव्याने प्रक्रिया करून न करता रद्द करण्यात आलेल्या पहिल्या भरतीतील उमेदवारांचे अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे व पात्र उमेदवार यादीचा ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या उपयोग करून घेत दि.28/03/2022 रोजी ग्राम पंचायतीने अवैधरीत्या ठराव करून आर्थिक संगतमताने केवळ इयत्ता 12वी वर्गात टक्केवारी जास्त आहे म्हणून आणि महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र.प्रानिम 1215/प्र.क्र.109/15/13-अ,दि. 05,ऑक्टोबर 2015 मधील तरतुदी व अटीनुसार सदर भरतीसाठी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याचे खोटे कारण देऊन व नितीन मंगल पारधी,सुनिल भिकन पाटील,मंगेश सिताराम मोरे ह्या उमेदवारांनी आपले अर्ज पदभरतीतून माघारी घेत असल्याचे खोटे लिहून राकेश विलास पाटील याची ग्रा.पं.कारकून कम लिपिक म्हणून 11 महिन्यासाठी तात्पुरती निवड केल्याचा अवैधरीत्या ठराव करण्यात आला आहे.
मुळातच, रद्दबातल ठरवण्यात आलेली भरती नव्याने प्रक्रिया करून शासनाच्या अटीनुसार करणे अपेक्षित असताना ग्रा.पं.पदाधिकारी यांनी संगनमत करून वशिलेबाजीचा वापर करून अवैधरीत्या ठराव केला आणि ग्रामविकस अधिकारी शासनाचे निर्णय डावलत अवैध पदभरती केलेली दिसून येत आहे.
तरी अवैधरीत्या करण्यात आलेली सदर ग्रा.पं.कारकून कम लिपिक पदभरती रद्द करून शासन निर्णयानुसार नवीन प्रकियेने घेण्यात यावी अन्यथा आम्ही वरिष्ठ स्तरावर तक्रारी करून ग्रा.पं.पदाधिकारी यांनी पदाचा केलेला दुरुपयोग व ग्रामविकास अधिकारी यांनी शासन निर्णय डावलून पदाचा दुरुपयोग करून पदाधिकारी यांच्यावर अपात्रतेची व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन ढीवरे यांनी पत्रांनव्ये केली आहे.,,,