वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
श्रीनाथ नंगे महाराज श्रीक्षेत्र डव्हा रथसप्तमी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक श्रीनाथ नंगे महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटक वाशिम जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संतोष गोमासे तर प्रमुख अतिथी म्हणून वृत्त निवेदक गणेश मोहळे, संदीप भातूडकर, मेजर अशोक घुगे, दैनिक तरुण भारतचे बळीराम अन्नसत्रे आदी मान्यवराच्या हस्ते संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीनाथ नंगे महाराज सार्वजनिक वाचनालय च्या वतीने दरवर्षी यात्रा महोत्सवानिमित्त आणि विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अधांतरी बाबा, चालता बोलता समाज सुधारक-गाडगेबाबा, विविध कुटुंब नियोजन, स्वच्छता अभियान, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित समाज प्रबोधनात्मक गीत गुंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेले असतात.
गत दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीमुळे उपरोक्त कार्यक्रम थांबले होते. तर यावर्षी विविध लेखक साहित्यिकांची पुस्तक प्रदर्शनी आयोजित करून अनेक यात्रेकरूंनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक ग्रंथालयाचे अध्यक्ष संस्थापक अनिल पुंडलिक बळी यांनी कार्यक्रम उद्घाटक तथा प्रमुख अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी श्रीनाथ नंगे महाराज व परमपूज्य विश्वनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी उद्घाटक वृत्तपत्र निवेदक संतोष भाऊ गोमाशे यांनी प्रस्तुत वाचनालयाची स्थिती पाहू समाधान व्यक्त केले, वृत्तनिवेदक गणेश मोहळे यांनी संबंधित ग्रंथालयातील पुस्तकांचा व वर्तमानपत्राचा लाभ गावकरी व विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
छायाचित्रकार संदीप भातुडकर व तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी बळीराम अंन्नसत्रे यांनी संबंधित पुस्तके वाचाल तर वाचाल या सुभाषितशी संबंधित असून येणाऱ्या काळात पुस्तकच माणसाला वाचवतील असा मोलाचा संदेश दिला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाच्या सौ. सविता बळी यांनी तर संचालक भारती तिवारी व आभार प्रदर्शन प्राध्यापक रमेश रत्ने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश काटेकर, अशोक मामा सुर्वे, पुष्पक भैय्या बळी, कु.रश्मी गुप्ता, महेक शेख,आदिनी पथक परिश्रम घेतले.