मुंबई मंत्रालय प्रतिनिधी चेतन महाजन ९६२३२४३५९३
खापर :- सोशल मीडिया आजच्या काळात समाज जिवणात इतका भिनला असुन प्रत्येकाची गरज बनला आहे यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हटले जाते पण आजच्या बदलत्या काळात व्हाटस ॲप ग्रुपवरुन जुळतात रेशीमगाठी म्हणण्याची वेळ आली आहे. खापर या.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथील सेवा निवृत्त प्रा.शिक्षक श्री.पोपट पंडित सोनवणे यांनी व्हाटस ॲप माध्यमातून उपवर वधुवरांसह व्हाटस ॲप माध्यमातून १३० विवाह जुळलेले आहेत व अजुन बरेच विवाह जुळण्याच्या मार्गावर आहेत ,त्याचप्रमाणे त्यांनी शैक्षणिक ग्रुप तयार करून शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक माहिती उपलब्ध करून दिली आहे बेटी बचाव बेटी पढाव ॠक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी राजा ग्रुप तयार केला आहे श्री.पोपट पंडित सोनवणे हे मुळ भामेर ता.साक्री जि.धुळे येथील आहेत पण ते खापर ता. अ.कुवा जि.नंदुरबार येथे स्थायीक झाले आहेत त्यांचा मुलगा श्री.रामदास पोपट सोनवणे हे सुरत येथे आय.सी.आय.सी.ॿॅकेत नोकरीला आहेत नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करीत आहेत


