वाशिम
अजय गायकवाड
मो.7798258831
नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत च्या निवडणुका पार पडल्या. यावेळी सरपंच पदाच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या मध्ये माळेगाव नकी धरमवाडी गट ग्रामपंचायत मधून सौ.स्वाती महादेव सरोदे ह्या सरपंच तर त्यांचे पती महादेव आयाजी सरोदे हे सदस्य म्हणून अनुसूचित जाती मधून पहिल्यांदाच निवडून आले.
माळेगाव नकी , धरमवाडी वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील असून आदिवासी बहुल असणारे ही गावे मात्र विकासापासून वंचितच राहिली.त्यामुळे गाव विकासाचा संकल्प करत पती पत्नी दोघांनीही लढविण्याचा विचार करून निवडणूक लढवून निवडून आले.गावाला अद्याप पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय नाही, पाण्याची समस्या,रस्त्याची समस्या दूर करून गावाचा विकास कशापद्धतीने करता येईल यावर जोर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाती महादेव सरोदे ह्या सरपंच असून महादेव सरोदे,सीताबाई धंदरे, वर्षा करवते,विकास भोंडणे,भागवत कदम,ज्योती लोखंडे हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
