अमळनेर शहरप्रतीनिधी, येथील जळगाव जिल्हा निवृत्ती सेवा संघ च्यां तालुका पदाधिकारी यांनी सेवा निवृत्ती वेतन दरमहा करावे,बाबत निवेदन देऊन केली मागणी.
सविस्तर वृत्त असे की,जिल्ह्यातील अनेक सेवा निवृत्ती धारकांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरप्रपंच सह ओषधा साठी लागणाऱ्या पैशांची तरतूद ही निवृत्ती वेतना वर अवलंबून राहावे लागत आहे.मात्र शासन निवृत्ती वेतन दरमहा करण्यात कार्यक्षम दिसत नसल्याची तक्रार निवृत्ती सेवा संघाच्या वतीने लोकप्रिनिधीं सह सरकार कडे वारंवार करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सेवा निवृत्त शिक्षकांचे पेन्शनलां लागणारी रक्कम अपूर्ण मिळत असल्याने पेन्शन होण्यास विलंब होत असल्याने पेन्शन धारक चिंतेत पडले आहेत.खरे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा विचार करता त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.जिल्ह्यात दोन दोन मंत्री असतांना जिल्ह्यातील सेवा निवृत्त धारकांना नियमित निवृत्ती वेतन मिळण्यासाठी वारंवार निवेदन द्यावे लागत असल्याने सरकार विरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहेत.
संघाचे तालुका अध्यक्ष हिम्मत पाटील यांनी देशोन्नतीलां सांगितले की, आम्हीं याबाबत राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत आणि याउपर जर निवृत्ती नियमित नझाल्यास त्यांना घेराव घालण्यात येईल.
याप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष प्रल्हाद सांगोले,सचिव वसंत पाटील,संघटक युवराज वाडे, चिंधू वानखेडे,सर्जेराव पाटील,शिवाजी पाटील,अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
